महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन
अधिनियम, कलम ६३- अ
(१) महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम, कलम ८४-क मध्ये, पोट-कलम (५) नंतर, पुढील पोट-कलम जादा दाखल करण्यात येईल (हैदराबाद कुळ कुळवहिवाट कलम ९८-क; विदर्भ कुळवहिवाट कायदा कलम १२२)
“(६) कलम ८४-क च्या पोट-कलमे (१) ते (५) यांमध्ये
काहीही अंतर्भूत असले तरी,
(एक) जर अशा जमिनीच्या हस्तांतरणाच्या किंवा
संपादनाच्या बाबतीत पोट-कलम (१) खालील कार्यवाही ही, महाराष्ट्र सुधारणा
अधिनियम, २०१६ याच्या प्रारंभाच्या दिनांकानंतर किंवा प्रारंभाच्या
दिनांकापूर्वी सुरू झाली असेल, परंतु, प्रारंभाच्या
दिनांकास किंवा दिनांकाच्या पूर्वी त्याबाबत कोणताही आदेश काढण्यात आलेला नसेल;
आणि
(दोन) जर शेतकरी असलेल्या हस्तांतरितीने धारण केलेल्या सर्व एकूण क्षेत्र महाराष्ट्र शेतजमीन (जमीन धारणेची कमाल मर्यादा) अधिनियम, १९६१ अन्वये अनुज्ञेय असलेल्या जमीन धारणेच्या कमाल क्षेत्राहून अधिक होत नसेल; आणि
(तीन) जर अशी हस्तांतरित किंवा संपादित केलेली जमीन ही,
(अ) केवळ शेतीविषयक प्रयोजनांसाठीच
वापरण्यात येत असेल,
आणि हस्तांतरितीने (कुळ वगळून) वार्षिक दर
विवरणपत्रानुसार, अशा जमिनीच्या बाजार मूल्याच्या पन्नास
टक्के एवढी रक्कम प्रदान केली असेल; किंवा
(ब) शेतीविषयक प्रयोजनांव्यतिरिक्त अन्य
कोणत्याही प्रयोजनासाठी वापरण्यात येत असेल व हस्तांतरितीने वार्षिक दर
विवरणपत्रानुसार अशा जमिनीच्या बाजार मूल्याच्या पंचाहत्तर टक्के एवढी रक्कम
प्रदान केली असेल,
तर, तहसिलदार अशा कोणत्याही जमिनीचे हस्तांतरण किंवा संपादन विधिअग्राह्य आहे, असे घोषित करणार नाही.
“(४) पोट-कलमे (१) ते (३) यांमध्ये काहीही अंतर्भूत
असले तरी,
जेथे हस्तांतरिती कलम ६३ च्या पोट-कलम (१) खालील आवश्यकतांची
पूर्तता करीत असेल तेथे,
(एक) जर पोट-कलम (१) खालील कार्यवाही ही, (दुसरी सुधारणा) अधिनियम, २०१६ च्या प्रारंभाच्या दिनांकानंतर सुरू झाली असेल किंवा ती, प्रारंभाच्या दिनांकापूर्वी सुरू करण्यात आलेली असेल, परंतु, कलम ६३ (हैदराबाद कुळवहिवाट कायदा कलम ४७; विदर्भ कुळवहिवाट कायदा कलम ८९) अन्वये ज्या शतींच्या अधीनतेने जमीन हस्तांतरण करण्याची परवानगी देण्यात आली होती अशा कोणत्याही शतींचा भंग केल्याबद्दल, अशा प्रारंभाच्या दिनांकास किंवा त्यापूर्वी उक्त पोट-कलम (१) अन्वये कोणताही आदेश काढण्यात आलेला नसेल; आणि
(दोन) (अ) जर
अशाप्रकारे हस्तांतरित केलेली जमीन ही, केवळ शेतीविषयक
प्रयोजनांसाठीच वापरण्यात येत असेल आणि हस्तांतरितीने (कुळ वगळून) वार्षिक
दर विवरणपत्रानुसार अशा जमिनीच्या बाजार मूल्याच्या पन्नास टक्के एवढी रक्कम
प्रदान केली असेल; किंवा
(ब) जर अशी हस्तांतरित केलेली जमीन ही शेतीविषयक
प्रयोजनांव्यतिरिक्त अन्य कोणत्याही प्रयोजनांसाठी वापरण्यात येत असेल व
हस्तांतरितीने वार्षिक दर विवरणपत्रानुसार अशा जमिनीच्या बाजार मूल्याच्या
पंचाहत्तर टक्के एवढी रक्कम प्रदान केली असेल, तर, जिल्हाधिकारी अशा कोणत्याही जमिनीचे हस्तांतरण विधिअग्राह्य आहे असे घोषित
करणार नाही.
परंतु, उक्त सुधारणेत ʻकुळ वगळूनʼ हा
शब्द प्रयोग असल्यामुळे एखाद्या
शेतजमीन मालकाने, त्याची शेतजमीन त्याच्या कुळाकडे हस्तांतरीत केली असेल परंतु
अशा शेतजमिनीची किंमत म्हणून शेतजमीन मालकास मिळालेली रक्कम ही कलम ६३-अ अन्वये निर्धारित
केली नसेल तर तसेच कलम ६३ अन्वये बिगर शेतकरी व्यक्तीला, सक्षम अधिकार्यामार्फत
शेतजमीन विकत घ्यायची परवानगी मिळाली असाल तर कलम ६३-अ अन्वये अशा शेतजमिनीची
वाजवी किंमत निर्धारित करता येईल.
काही ठिकाणी, गाव नमुना सात - बारा सदरी, इतर हक्कात ʻकु. का. कलम ६३-अ साठी पात्रʼ किंवा तत्सम प्रकारचे शेरे आहेत. अशा ठिकाणी तो शेरा कोणत्या कारणामुळे नोंदविण्यात आला याबाबतची फेरफार नोंद बघून कु. का. कलम ६३-अ अन्वये रक्कम ठरवायची किंवा कु. का. कलम ८४-क (६) अथवा कु. का. कलम ८४-क क (४) अन्वये रक्कम वसूल करायची याबाबत निर्णय घ्यावा लागेल.
तसेच विक्री किंवा खरेदी झालेल्या/केलेल्या कोणत्याही शेतजमिनीची किंमत कशी ठरवावी याबाबत कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियमात स्पष्टपणे तरतूद केली नसेल तर, अशा जमिनीची किंमत ठरविण्यासाठी कलम ६३-अ चा वापर करावा लागेल.
4महाराष्ट्र
कुळवहिवाट अधिनियमाच्या कलम ८४- क म्हणजे
· हैदराबाद
कुळवहिवाट कायदा कलम ९८- क
· विदर्भ
कुळवहिवाट कायदा कलम १२२.
· हैदराबाद
कुळवहिवाट कायदा कलम ४७
·विदर्भ
कुळवहिवाट कायदा कलम ८९
Rate This Article
या लेखात, आम्ही आपणाला कुळवहिवाट अधिनियम, कलम ६३-अ. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.
आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. आणि आमच्या टेलिग्राम चॅनेललाही आजच जॉईन व्हा. Website Link Telegram Channel Link धन्यवाद !