'संकीर्ण
जमीन महसूल'
१. पाच
वर्षांपेक्षा कमी कालावधीकरिता लागवडीसाठी दिलेली आकारी पड जमीन. (उपकरांसह)
२.
खालील प्रयोजनांसाठी दिलेली
बिन आकारी जमीन:
· कलिंगडांच्या बागा लागवडीसाठी
· बेट जमिनी
· लागवडीसाठी दिलेली मळई जमीन
· गवत लागवडीसाठी दिलेली कुमरी
जमीन किंवा
डोंगराळ पट्टे.
· लागवडीसाठी दिलेली गायरान जमीन
३. मळईच्या जमिनी व इतर जमिनींचा एकसाली खंड.
४. बेटे, कुरणे व पड जमिनींवरील लिलाव करून विकलेले गवत
किंवा चराई.
५. झाडांपासून मिळणारी फळे, सुके लाकूड, काटे, पाने यांचे विक्री उत्पन्न
६.
बोरू, लाख, कचरा, शिंदाड, सोरा यांसारखी संकीर्ण उत्पादने गोळा
करण्याचे जमीन भाडे.
७.
अनधिकृत लागवडीबाबत
निव्वळ आकारणी करून परंतु दंड न आकारता
वसूल केलेली रक्कम.
८.
(अ) जमीन महसुलामध्ये
जमा केलेली प्रासंगिक पाणीपट्टी
८. (ब) अनधिकृत जलसिंचनाकरिता वसूल
केलेला पाणीपट्टीवरील दंड.
९. (अ) अकृषिक भाडे किंवा मागील वर्षाचा किंवा खंडित कालावधीचा किंवा ५ वर्षांहून कमी कालखंडासाठी कृषिक आकारणी केलेल्या किंवा आकारणी न केलेल्या जमिनींपासून मिळणारा महसूल
९. (ब) सरकारी पड जमिनीवर बांधलेल्या विट भट्ट्या
व चुनाभट्ट्यांच्या फीच्या रकमा.
१०. तात्पुरत्या स्वरूपात अकृषिक प्रयोजनार्थ आकारलेली
ठोक रूपांतरण (कॉम्प्युटेशन) शुल्क,
अनधिकृत भोगवट्यासाठीची आकारणी
आणि परवानगीने केलेल्या अकृषिक वापरासाठी बसवलेल्या दंडासह. परंतु,
शास्ती म्हणून बसवलेला दंड वगळून.
११. तालुका कार्यालयात प्रसंगतः गोळा केलेला पट्ट्याने दिलेल्या जमिनींवरील खंड व स्वामित्वधन.
१२. आधीच्या वर्षी निर्लेखित केलेला जमीन महसूल त्यानंतर एखाद्या प्रकरणी वसूल केला गेला असल्यास ती रक्कम.
१३. जमीन महसूल न भरल्यामुळे, थकबाकीच्या २५ टक्केपर्यंत भरलेली दंडाची रक्कम/शास्ती.
याशिवाय,
· विटभटटी
बिनशेती वसुली (उपकरांसह)
· अनधिकृत
अकृषीक वापर वसुली (उपकरांसह)
· दुरसंचार
/ मोबाइल टॉवर शुल्क (उपकरांसह)
ज्या संकीर्ण जमीन महसुलाचा संबंध जमिनीच्या उपयोगाशी नसतो त्यावर स्थानिक उपकर आकारला जात नाही.
१.
नोटीस फी.
२. (अ)
अधिकार अभिलेख कायद्याखालील दंड. कलम१५२ (विहीत मुदतीत माहिती न दिल्याबाबत दंड).
२. (ब) कलम १६७, (निस्तार पत्रक, वाजिब-उल-अर्ज मधील नियमांचा
भंग)
३. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, कलम २१४ (सक्तीची वसुली तरतुदीखाली
मालमत्तेची विक्री कायम झाल्यानंतरही रक्कम अदा करण्यात कुसूर करणे) अन्वये
विक्री खर्चाची वसुली.
४. कृषिक
किंवा अकृषिक प्रयोजनार्थ,
परवानगीशिवाय जमिनीचे (पाटबंधारे
किंवा इतर विभागाने धारण केली असली तरीही) विनियोजन
केल्याबद्दल दंड (कलम ४५- मंजूर प्रयोजनाव्यतिरिक्त
अन्य प्रयोजनासाठी जमिनीचा वापर करणे, कलम ५१-अतिक्रमणे नियमात बसविणे)
५. पूर्ण आकारणीवर
दरवर्षी स्थानिक उपकर भरणाऱ्या इनामदारांनी
उत्तराधिकार प्राप्त झाला असता किंवा हस्तांतरण झाले असता
दिलेला प्रासंगिक नजराणा.
६. इनामे व वतने
यांवरील पूर्ण वर्षासाठी व मागील
वर्षासाठी,
खंडित कालावधीकरिता नुकसानाच्या
प्रमाणातील,
गैरहजेरी आकार आणि अशा प्रकारच्या इतर सर्व वसुली.
७. चराई फी.
८. कायद्याने प्रस्थापित करण्यात आलेल्या वनांच्या संबंधात महसूल विभागाने
वसूली केली असल्यास अशी वसुली. ((अ) मधील बाब चार व पाच पहा)
९. भोगवटा
अधिकाराच्या विक्रीपासून मिळणारे उत्पन्न.
१०. कोणत्याही कालावधीकरिता, लागवडयोग्य जमिनीपासून मिळणारे जमिनीचे किंवा भोगवटा अधिकाराचे (कलम १७९ (ज्या वहिवाटींबाबत किंवा धारण केलेल्या दुमाला जमिनींबाबत थकबाकी येणे असेल त्यावेळी वहिवाटी किंवा धारण केलेल्या दुमाला जमिन जप्त करणे) अन्वये विकलेल्या (कसूरदारांच्या अधिकारांव्यतिरिक्त) जमिनींचे विक्री उत्पन्न.
११. भोगवटा वर्ग दोन चे भोगवटा वर्ग एक
मध्ये केलेल्या अधिकृत रूपांतरांवर
दिलेले अधिमूल्य.
१२. पाटबंधारे
किंवा वीज विभागाकडे जमा करण्याजोग्या मत्स्य उत्पादनापासून मिळणारी प्राप्ती.
१३. निरा वृक्षांपासून मिळणारे भाडे.
=
Rate This Article
या लेखात, आम्ही आपणाला संकीर्ण जमीन महसूल. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.
आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. आणि आमच्या टेलिग्राम चॅनेललाही आजच जॉईन व्हा. Website Link Telegram Channel Link धन्यवाद !