आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न आमच्या वेबसाईटवर विचारावेत. 📌Mahsul Guru📌

महसूल अभिलेख, ई-हक्क’ व्दारे अर्ज --- आता नागरिक सुविधा केंद्रातून

 

महसूल अभिलेख, ई-हक्क व्दारे अर्ज --- आता नागरिक सुविधा केंद्रातून

 महाराष्‍ट्र शासनाने, शासन निर्णय क्रमांकः राभुअ-२०२१/प्र.क्र.२११/ल-१, दिनांक ५.१२. २०२३ अन्‍वये, महसूल अभिलेख सेतू/आपले सरकार सेवा केंद्र/ महा-ई सेवा केंद्र या नागरिक सुविधा केंद्रांमार्फत उपलब्ध करून देण्‍याचा तसेच ई-हक्क प्रणालीव्दारे काही महत्‍वाचे अर्ज सादर करण्‍याची सुविधा उपलब्ध करून देण्‍याचा महत्‍वाचा निर्णय घेतला आहे.

 प्रत्येक खातेदाराकडे डिजिटल स्वाक्षरीत अभिलेख उपलब्ध करून घेण्यासाठी संगणक, लॅपटॉप, प्रिंटर आणि इंटरनेट जोडणी उपलब्ध असेलच असे नाही, म्हणून असे डिजिटल स्वाक्षरीत अभिलेख सामान्य जनतेला उपलब्ध करून देणाऱ्या व्यक्ती, संस्था अथवा सेवा केंद्र यांनी आकारावयाच्या नक्कल फी बाबत एकवाक्यता रहावी व नागरिकांची आर्थिक पिळवणूक होवू नये याकरीता तसेच ई- हक्क प्रणालीव्दारे नागरिकांना अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने घेतला आहे.

 महाभूमी पोर्टल वर https://digitalsatbara.mahabhumi.gov.in/dslr या संकेतस्थळावरून उपलब्ध होणारे डिजिटल स्वाक्षरीत डेटाबेस आधारित संगणकीकृत गाव नमुना सात-बारा आणि गाव नमुना आठ-अ यांवर दर्शविलेल्या क्युआर कोड (QR CODE) व १६ अंकी पडताळणी क्रमांकाच्‍या आधारे त्याची सत्यता पडताळणी करणे शक्य आहे. हे डिजिटल स्वाक्षरीत अभिलेख दि.२३.११.२०२० च्या शासन परिपत्रकान्वये सर्व कायदेशीर व शासकीय कामकाजासाठी ग्राह्य समजले जातात. हे सर्व डिजिटल स्वाक्षरीत अभिलेख शासनाच्या महाभूमी पोर्टल वर सामान्य नागरिकांना डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध आहेत.

 ई-फेरफार प्रकल्पांतर्गत राज्यातील सर्व अधिकार अभिलेखामधील गाव नमुना सात-बारागाव नमुना आठ-अ संगणकीकृत करण्यात आले असून संगणकीकृत अभिलेखापैकी जे अभिलेख डिजिटल स्वाक्षरीत स्वरूपात उपलब्ध करून देणेत आले आहेत त्यांची नक्कल फी शासनाने खालील प्रमाणे निश्चित केली आहे. सदर संगणकीकृत अभिलेख खालील दरानुसार सेतू/आपले सरकार सेवा केंद्र / महा ई-सेवा केंद्र यांचेमार्फत उपलब्ध करून देण्यास मान्यता मिळाली आहे. 

अभिलेख

दर

रक्‍कम विभागणी

गाव नमुना सात-बारा

 

गाव नमुना आठ-अ

रू.२५/-

(कमाल पृष्ठ संख्या: - दोन)

 रू.२५/-

(कमाल पृष्ठ संख्या: - दोन)

  दोनपेक्षा अधिक पृष्ठे असल्यास, प्रतिपृष्ठ रू. २/- प्रमाणे शुल्क, सेवा केंद्र चालकास घेता येईल.

रू.२५ पैकी

  रू. ५/-: राज्य शासन

  रू.१०/-: जमाबंदी आयुक्त व संचालक, भूमी अभिलेख, पुणे यांच्‍याकडील स्विय प्रपंजी लेखा खाते

  रु.१०/-:  सेतू / आपले सरकार सेवा केंद्र /महा ई-सेवा केंद्र

 भूलेख संकेतस्थळावरील https://bhulekh.mahabhumi.gov.in या लिंकवरून विनाशुल्क उपलब्ध होणारे विनास्वाक्षरीत गाव नमुना सात-बारा आणि गाव नमुना आठ-अ, ज्यावर महाभूमीचा वाटरमार्क असतो आणि ज्यावर क्युआर कोड किंवा १६ अंकी पडताळणी क्रमांक दर्शविलेला नसतो, असे अधिकार अभिलेख फक्त माहितीसाठी असून ते कोणत्याही कायदेशीर आणि शासकीय कामासाठी वैध समजण्यात येत नाहीत. सदर विनास्वाक्षरीत गाव नमुना सात-बारा आणि गाव नमुना आठ-अ, कोणत्याही आपले सरकार सेवा केंद्र, महा-ई-सेवा केंद्र, सेतू केंद्र अथवा संग्राम केंद्रचालक यांना त्यांचे सही शिक्क्याने विक्री/वितरण करता येणार नाहीत याची नोंद घ्‍यावी.  

 œ ई-हक्क प्रणालीव्दारे फेरफार नोंदणीसाठी अर्ज:

आता अधिकार अभिलेखामध्ये फेरफार घेण्याची संपूर्ण प्रक्रिया संगणकीकृत करण्यात आली असून, त्यासाठी राष्ट्रीय सुचना विज्ञान केंद्र (NIC) पुणे यांच्‍यामार्फत ई-फेरफार प्रणाली विकसीत केली आहे.

यापूर्वी अनोंदणीकृत दस्तऐवजाचे फेरफार नोंदवण्यासाठी खातेदार किंवा नागरिकांना तलाठी कार्यालयात, संबंधित कागदपत्रांसह समक्ष उपस्थित राहून अर्ज दाखल करावा लागत असे.

परंतु यासाठी आता ई-हक्क प्रणाली विकसीत करण्यात आली आहे. याव्दारे कोणत्याही खातेदार किंवा नागरीकाला काही फेरफार नोंदीसाठी ऑनलाईन पध्दतीने आवश्यक कागदपत्र अपलोड करून अर्ज दाखल करता येईल जो थेट संबंधित तलाठी कडे ऑनलाईन पध्दतीने पाठवला जाईल.

 ई-हक्क प्रणालीव्दारे फेरफार अर्ज नोंदविण्यासाठी प्रथम https://pdeigr.maharashtra.gov.in/frmLogin या वेबसाईटवर नोंदणी करावी.

 ई-हक्क प्रणालीव्दारे अपलोड करावयाची कागदपत्रे व अंदाजित दर याबाबतचा तपशील खालीलप्रमाणे निर्धारित करण्यात आला आहे.

अ.क्र.

 

फेरफार नोंद प्रकार

आवश्यक कागदपत्रे

अंदाजित

पृष्ठ संख्या

सेतू/ आपले सरकार सेवा केंद्र

/ महा ई सेवा केंद्रांकरीता

अंदाजित दर

ई-करार

 

सोसायटी ई-करार प्रत आणि

अधिक एक कागदपत्र

दोन

रू.२५/-

दोनपेक्षा अधिक पृष्ठे असल्यास, प्रतिपृष्ठ रू. २/- प्रमाणे शुल्क, सेवा केंद्र चालकास घेता येईल.

बोजा दाखल करणे/गहाण खत

बँकेची प्रत व गहाण खताची प्रत आणि अधिक एक कागदपत्र

तीन

रू.२५/-

तीनपेक्षा अधिक पृष्ठे असल्यास, प्रतिपृष्ठ रू. २/- प्रमाणे शुल्क, सेवा केंद्र चालकास घेता येईल.

बोजा कमी करणे

बँकेची प्रत आणि अधिक एक कागदपत्र

दोन

रू.२५/-

दोनपेक्षा अधिक पृष्ठे असल्यास, प्रतिपृष्ठ रू. २/- प्रमाणे शुल्क, सेवा केंद्र चालकास घेता येईल.

वारस नोंद

 

मृत्यु दाखला सत्यप्रत, इतर आणि अधिक एक कागदपत्र

तीन

रू.२५/-

तीनपेक्षा अधिक पृष्ठे असल्यास, प्रतिपृष्ठ रू. २/- प्रमाणे शुल्क, सेवा केंद्र चालकास घेता येईल.

मयत व्‍यक्‍तीचे नाव

कमी करणे

 

अर्जदाराचे ओळखपत्र, मृत्युचा दाखला आणि स्वयंघोषणापत्र/ संमत्ती पत्र

 

तीन

रू.२५/-

तीनपेक्षा अधिक पृष्ठे असल्यास, प्रतिपृष्ठ रू. २/- प्रमाणे शुल्क, सेवा केंद्र चालकास घेता येईल.

अ.पा.क. शेरा कमी करणे

खातेदाराचा वयाचा पुरावा आणि अधिक एक कागदपत्र

दोन

रू.२५/-

दोनपेक्षा अधिक पृष्ठे असल्यास, प्रतिपृष्ठ रू. २/- प्रमाणे शुल्क, सेवा केंद्र चालकास घेता येईल.

एकत्र कुटुंब मॅनेजर (ए.कु.मॅ.) नोंद कमी करणे

.कु.मॅ. संबधित फेरफार, सहधारक/ वारस यांचे स्वयंघोषणा पत्र आणि अधिक एक कागदपत्र

तीन

रू.२५/-

तीनपेक्षा अधिक पृष्ठे असल्यास, प्रतिपृष्ठ रू. २/- प्रमाणे शुल्क, सेवा केंद्र चालकास घेता येईल.

विश्वस्थांचे नाव बदलणे

धर्मादाय आयुक्त यांचे आदेश/ पत्र आणि अधिक एक कागदपत्र

दोन

रू.२५/-

दोनपेक्षा अधिक पृष्ठे असल्यास, प्रतिपृष्ठ रू. २/- प्रमाणे शुल्क, सेवा केंद्र चालकास घेता येईल.

रक्‍कम विभागणी

रू.२५ पैकी

  रू.१०/-: ई-फेरफार प्रकल्प सेवाशुल्‍क (ई-फेरफार प्रकल्प सेवाशुल्क हे जमाबंदी आयुक्त व संचालक, भूमी अभिलेख, पुणे यांच्‍या कार्यालयातील स्विय प्रपंजी लेखा खाते यामध्ये जमा करण्यात येईल)

  रु.१/-:  सेतू / आपले सरकार सेवा केंद्र /महा ई-सेवा केंद्र प्रचलित सेवाशुल्क आकारणी.

कोणत्याही खातेदार/ नागरीकाने वैयक्तिकरित्या सदर कागदपत्रे अपलोड केल्यास, सदर सेवा खातेदार/ नागरीकासाठी निःशुल्क राहील.

 

hœf

 

 

Comments

Archive

Contact Form

Send

Mahsul Guru

Subscribe YouTube Channel