आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न आमच्या वेबसाईटवर विचारावेत. 📌 Mahsul Guru 📌 YouTube Channel Link!
Posts

म.ज.म.सं. १९६६, कलम १५५ अन्वये लेखन प्रमाद दुरूस्‍त करण्‍याची उपविभागीय अधिकारी यांनी परवानगी देणेबाबत.

Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

 क्रमांक-१५५-परवानगी/ सी.आर क्र.... / २०२६                                                                                                                                                          उपविभागीय अधिकारी,

....... उपविभाग,

जिल्‍हा ......... यांचे कार्यालय

                                                                      फोन नंबर

                                                                      इ-मेल

                                                                      दिनांक

प्रति,

तहसिलदार........

तालुका........, जिल्‍हा.....

 विषय:- महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६, कलम १५५ अन्वये लेखन प्रमाद दुरूस्‍त करण्‍याची परवानगी देणेबाबत.

संदर्भ:- १. आपले विनंती पत्र क्रमांक ................................., दिनांक: .../.../...

 संदर्भ:- २. महाराष्ट्र शासन महसूल विभाग, शासन परिपत्रक क्र.संकिर्ण-२०२६/प्र.क्र.८०/जमीन-०१अ,  

दिनांक १९ ऑगस्ट, २०२६, मुद्‍दा क्रमांक २-(आ)

 संदर्भ क्रमांक १ अन्‍वये नमूद, महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६, कलम १५५ अन्वये लेखन प्रमाद दुरूस्‍त करण्‍याची परवानगी मिळण्‍याबाबत आपले विनंतीपत्र या कार्यालयास प्राप्‍त झाले आहे.

 संदर्भ क्रमांक २ अन्‍वये, पाच वर्षांपेक्षा जास्त जुना लेखन प्रमाद दुरुस्त करण्यासाठी तहसिलदार यांनी संबंधित उपविभागीय अधिकारी यांची पूर्वपरवानगी घेऊनच असे लेखन प्रमाद दुरुस्त करावेत अशी तरतूद आहे.

 क. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६, कलम १५५ अन्वये अधिकार अभिलेखात किंवा महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६, प्रकरण १० अन्‍वये ठेवण्यात आलेल्या नोंदवहीत केवळ खातेदाराच्‍या नावातील चूक, भूमापन क्रमांक किंवा नगर भूमापन क्रमांक लिहिताना झालेली अंकांची अदलाबदल, जमिनीचे क्षेत्र लिहिताना होणारी चूक, एखाद्या खातेदाराचे नाव चुकून वगळले जाणे किंवा टायपिंग मुळे चुकीचे लिहिलेले असणे, मूळ आशयात बदल न होता केवळ लेखन प्रक्रियेत राहून गेलेली मानवी किंवा तांत्रिक चूक दुरुस्त करण्याचे अधिकार  आहेत. महाराष्ट्र जमीन महसूल संहितेच्या कलम १०६ अन्वये चुका दुरुस्त करण्याबाबतची तरतूद, तसेच कलम २४७ किंवा २५७ अन्वये अपील किंवा पुनरीक्षण करणे अपेक्षित असलेल्या विषयाकरिता कलम १५५ खाली दुरुस्त न करण्याबाबतच्‍या ताकीद कडे आपले लक्ष वेधण्‍यात येत आहे.

 ख. ज्या जमिनीच्या बाबतीत हस्तांतरणास निर्बंध आहेत किंवा अशी चूक दुरुस्त केल्यास शासनाच्या महसुलावर विपरीत परिणाम होणार आहे, अधिकार अभिलेखात शासनाच्या विविध विभागांच्या नावावर असलेल्या जमिनी, स्थानिक स्वराज्य संस्था, राज्य शासनाच्या अंगीकृत सार्वजनिक प्राधिकरणाच्या नावावर असलेल्या जमिनीच्या बाबतीत असे अधिकार प्रदान करण्यात आलेले नाहीत हेही लक्षात ठेवावे.

संदर्भ क्रमांक १ अन्‍वयेच्‍या विनंतीपत्रासोबत संलग्‍न कागदपत्रांचे अवलोकन करता, उक्‍त लेखन प्रमाद हा पाच वर्षापेक्षा जास्त जुना असल्‍याचे दिसून येते अणि सदर लेखन प्रमाद दुरूस्‍त करणे हे न्‍यायोचित होईल अशी माझी खात्री झाली आहे.

सबब, संदर्भ क्रमांक २ च्‍या तरतुदीनुसार आणि या परवानगीतील उक्‍त  क आणि ख च्‍या निर्देशांच्‍या अधिन राहून आपणास संदर्भ क्रमांक १ मध्‍ये नमूद प्रकरणात, महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६, कलम १५५ अन्वये लेखन प्रमाद दुरूस्‍त करण्‍याची परवानगी देण्‍यात येत आहे.

 ठिकाण:                                                  उपविभागीय अधिकारी,....... उपविभाग,

दिनांक:                                                   जिल्‍हा...                                                                           

                                                                                       

.........................................................................................................................................

 

 

 

 

 

Rate This Article

या लेखात, आम्ही आपणाला म.ज.म.सं. १९६६, कलम १५५ अन्वये लेखन प्रमाद दुरूस्‍त करण्‍याची उपविभागीय अधिकारी यांनी परवानगी देणेबाबत.. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.

आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. आणि आमच्या टेलिग्राम चॅनेललाही आजच जॉईन व्हा. Website Link Telegram Channel Link धन्यवाद !

Getting Info...

About the Author

Deputy Collector in Revenue Dept. Government of Maharashtra

Post a Comment

Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.