आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न आमच्या वेबसाईटवर विचारावेत. 📌Mahsul Guru📌

मुंबई पोलीस अधिनियमान्‍वये हद्दपार कारवाई


मुंबई पोलीस अधिनियमान्‍वये हद्दपार कारवाई

कायद्याच्या परिभाषेत शांतता याचा अर्थ सार्वजनिक शांतता किंवा सुरक्षितता असा होतो. देशातील प्रत्येक नागरिकाला आपापले वैयक्तिक जीवन सुखरूपपणे व शांततामय वातावरणात जगण्याचा हक्क आहे. राजाला किंवा सरकारलासुद्धा आपले राज्य शांततेने व सुरक्षिततेने चालावे, अशीच अपेक्षा असते. या शांततेच्या वैयक्तिक व सांघिक अपेक्षेमधून इंग्लंडमध्ये मध्ययुगाच्या सुमारास राजाची शांतता (किंग्ज पीस) असा शब्दप्रयोग रूढ झाला. ब्रिटिश अंमल सुरू झाल्यानंतर भारतामध्ये हीच संकल्पना `सार्वजनिक शांतता’ ( पब्लिक पीस) किंवा सुरक्षितता म्हणून ओळखली जाते. 
बेशिस्त व बेकायदेशीर जमावाच्या हातून शांतताभंग व गंभीर गुन्हे घडण्याचा संभव असल्यामुळे भारतीय दंड विधान, कलम १४१ ते १६० यांमध्ये शांतताभंगाच्या बाबतीत तरतुदी करण्यात आल्या आहेत. 
फौजदारी प्रक्रिया संहिता, कलम १२९ च्या तरतुदीनुसार कुठल्याही कार्यकारी दंडाधिकाऱ्याला किंवा पोलीस उपनिरीक्षकाला वा त्याच्यापेक्षा वरच्या श्रेणीतील पोलीस अधिकाऱ्याला बेकायदेशीर जमाव एकत्र झाल्याची खबर मिळाल्यास अशा जमावाला पांगवण्याचा किंवा विसर्जित होण्याचा हुकूम देता येतो व सदर हुकूमाची पायमल्ली करणाऱ्या व्यक्तीस अटक करून कोठडीत ठेवता येते.
 'षधापेक्षा प्रतिबंध बरा' या इंग्रजी म्हणीप्रमाणे शांतताभंग करणारा गुन्हा घडल्यावर त्याबद्दल शिक्षा करण्याऐवजी शांतताभंग होऊच नये यासाठी आगाऊ खबरदारी घेण्याच्या दृष्टीने पोलीस आणि कार्यकारी दंडाधिकाऱ्यांना ठराविक मुदतीचे हमीपत्र घेण्‍याचा, स्‍थानबध्‍द करण्‍याचा, चांगल्या वर्तणुकीची हमी घेण्याचा अधिकार आहे. दहशतवादाला पायबंद घालण्याच्या दृष्टीने `टाडा’, `मिसा `पोटा’, `मोक्काइ. अधिनियम करण्यात आलेले आहेत. मुंबई पोलीस अधिनियमाखाली सराईत गुन्हेगारांना हद्दपार करण्‍याचा अधिकार आहे.

मुंबई पोलीस अधिनियम, १९५१ मधील कलम ५५ ते ६३ अअ अन्‍वये हद्दपार कारवाईशी संबंधित विवरण नमुद आहे. उपविभागीय दंडाधिकारी यांनी हद्दपार संबंधित कारवाई करतांना स्‍वत:च्‍या बुध्दीचा वापर करणे अपेक्षित आहे. फक्त पोलीस अहवालावर अवलंबून हद्दपार संबंधित कारवाई करू नये. हद्दपार संबंधित कलमे पुढील प्रमाणे. 

¿ मुंबई पोलीस अधिनियम, कलम ५५ - व्यक्तींच्या टोळ्या व जमाव यांची पांगापांग करणे :
हे कलमटोळीशी संबंधीत आहे. टोळी म्हणजे दोन पेक्षा जास्त इसम अशी व्याख्‍या कायद्यात आहे. एखादी टोळी, एखाद्या क्षेत्रात फिरत असल्यामुळे किंवा तळ देऊन राहिल्यामुळे तेथील कायदा व सुव्यवस्थेस धोका निर्माण झाला आहे व ती टोळी बेकायदेशीर रितीने वागण्याचा संशय निर्माण झाला आहे अशा परिस्‍थितीत या कलमाखाली कारवाई करता येते.
मु.पो.अ. कलम ५५ अन्‍वये कारवाई करतांना वर्तमान परिस्थितीचा (Present tense) विचार करणे आवश्‍यक आहे. मु.पो.अ. कलम ५५ अन्‍वये कारवाई करतांना प्रथम अशा टोळीचा म्होरक्या निश्‍चित करून त्याला नोटीस पाठवावी. एकापेक्षा जास्त म्होरके असतील तर सर्वांना नोटीस पाठवावी. ही कारवाई प्रतिबंधात्मक कारवाईत मोडते. पोलीसांनी नमूद केलेला टोळीच्या वास्तव्याचा काळ तसाच गृहीत धरू नये. त्यामुळे बुध्दीचा वापर केला आहे असा न्यायालयास दिसून येत नाही. टोळीच्या वास्तव्याचा काळ ठरवणेसाठी स्‍वत: खात्री करावी, यात स्वेच्छाधिकार वापरण्यास मुभा आहे. या कलमाखाली कारवाई करणेसाठी ठोस कारण हवे. फक्त पोलीस अहवालावरून कारवाई झाली असे दिसून येऊ नये. या कलमान्वये कारवाई करून काढलेला आदेश हा वाजवी (reasonable) असावा.

¿ मुंबई पोलीस अधिनियम, कलम ५६ - अपराध करण्याच्या बेतात असलेल्या व्यक्तींना काढून लावणे :
मुंबई पोलीस अधिनियम, कलम ५६ () अन्‍वये अपराध करण्याच्या बेतात असलेल्या व्यक्तींना काढून लावण्‍याचे अधिकार जिल्‍हा दंडाधिकारी व उपविभागीय दंडाधिकारी यांना आहेत.
मु.पो.अ. कलम ५६ अन्‍वये कारवाई करतांना बेतात असलेल्या व्यक्तींना(About to commit)  हा शब्द महत्वाचा आहे. कोणत्याही व्यक्तीच्या हालचाली किंवा कृत्ये यांपासून इतर व्यक्तींना/मालमत्तेला भय, धोका, इजा होण्याचा संभव आहे आणि त्यामुळे त्यांना काढून लावणे आवश्‍यक असले पाहिजे. या कलमाखाली कारवाई करतांना वर्तमान परिस्थितीचा (Present tense) विचार करावा. तसेच अशा व्यक्तीचा गुन्हा करण्यासाठीचा सहभाग (involvement), ताकद (Force), बळजबरी/जुलूम (violence) याचाही विचार करावा.
¨ मुंबई पोलीस अधिनियम, कलम ५६ ()(अ) अन्‍वये कोणत्याही व्यक्तीच्या हालचाली किंवा कृत्ये यांपासून इतर व्यक्तींना/मालमत्तेला भय, धोका, इजा होण्याचा संभव असल्‍यास,
¨ मुंबई पोलीस अधिनियम, कलम ५६ ()(ब) अन्‍वये कोणतीही व्‍यक्‍ती, भा.दं.वि. प्रकरण १२ (न्यायासंबंधी व सरकारी स्टँप संबंधी अपराध) किंवा भा.दं.वि. प्रकरण १६ (मनुष्याच्या शरीराच्या व जीवाविरूध्द अपराध) किंवा भा.दं.वि. प्रकरण १७ (मालाच्या विरूध्द अपराध) यान्‍वये शिक्षेस पात्र अपराध करीत असल्‍यास किंवा करण्‍याच्‍या बेतात असल्‍यास,
¨ मुंबई पोलीस अधिनियम, कलम ५६ ()(क) अन्‍वये बाहेरुन आलेली व्‍यक्‍ती सतत राहिल्‍याने साथीचे रोग उद्‍भवण्‍याचा धोका असेल तर अशा व्‍यक्‍तीला हद्‍दीबाहेर घालवून देता येते. अशा व्‍यक्‍तीने कोणत्या मार्गाने/रस्त्याने जावे हे सुध्‍दा आदेशात नमूद करता येते तसेच परतण्याबाबतची योग्य ती अट लादता येते.

¿ मुंबई पोलीस अधिनियम, कलम ५६(): सक्षम अधिकार्‍यास त्याचा रहिवासाचा पत्ता कळविण्याची अट
मुंबई पोलीस अधिनियम, कलम ५६ () अन्‍वये, हद्दपार केलेल्या व्यक्तीवर तो ज्या ठिकाणी जात आहे तेथील सक्षम अधिकार्‍यास त्‍याने त्याचा रहिवासाचा पत्ता कळवावा अशी अट लादता येते. हद्दपार आदेशात ही अट नमूद करता येते.

¿ मुंबई पोलीस अधिनियम, कलम ५७ - विविक्षित सिध्ददोष व्यक्तींना या कलमान्वये घालवून देणे:
या कलमान्‍वये कारवाई करतांना,दोष सिध्दी(Conviction) हा महत्‍वाचा घटक आहे.
कोणत्‍याही व्‍यक्‍तीला, भा.दं.वि. प्रकरण १२ (न्यायासंबंधी व सरकारी स्टँप संबंधी अपराध) किंवा भा.दं.वि. प्रकरण १६ (मनुष्याच्या शरीराच्या व जीवाविरूध्द अपराध) किंवा भा.दं.वि. प्रकरण १७ (मालाच्या विरूध्द अपराध) किंवा मुंबई दारूबंदी अधिनियम १९४९, कलम ६५, ६६-अ, ६८ अन्‍वये दोषी ठरविण्‍यात आले असेल किंवा मुंबई दारूबंदी अधिनियम १९४९, कलम ६५, ६६-अ, ६८ वगळता इतर कलमान्‍वये दोन किंवा अधिकवेळा दोषी ठरविण्‍यात आले असेल /स्त्रिया व मुली यांचा अनैतिक व्यापारास आळा घालणे अधिनियम १९५६, कलम ३, ४, ५, ६ अन्‍वये दोषी ठरविण्‍यात आले असेल किंवा सीमा शुल्क अधिनियम १९६२, कलम १३५ अन्‍वये दोषी ठरविण्‍यात आले असेल /मुंबई जुगार प्रतिबंधक कायदा १८८७, कलम ४ अन्‍वये दोषी ठरविण्‍यात आले असेल किंवा सार्वजनिक ठिकाणी किंवा रेसकोर्सवर पैज स्‍वीकारल्‍याबद्‍दल अन्‍वये दोषी ठरविण्‍यात आले असेल किंवा रेल्वे मालमत्ता अनधिकृतपणे बाळगणे अधिनियम १९६९, कलम ३ व ४ अन्‍वये दोन किंवा अधिकवेळा दोषी ठरविण्‍यात आले असेल किंवा मुंबई पोलीस अधिनियम १९५१, कलम १२२ किंवा १२४ अन्‍वये तीन किंवा अधिकवेळा दोषी ठरविण्‍यात आले असेल तर अशा व्‍यक्‍तीस हद्‍दीबाहेर घालवून देता येते.
या कलमान्‍वये कारवाई करतांना,दोष सिध्दी(Conviction), वर नमूद गुन्ह्याचे प्रकार आणि अशा व्‍यक्तीने अलिकडच्या काळात शिक्षा भोगलेली असणे हे महत्वाचे घटक आहेत.

¿ मुंबई पोलीस अधिनियम, कलम ५७ - अ: भिकारी म्हणून घोषित केलेल्या व्यक्तीस घालवून देणे:     
या कलमान्वये कारवाई करतांना सुनावणी आणि तपासणी महत्वाची आहे. या कलमान्वये आदेश काढण्यापूर्वी संबंधीत व्यक्तीला सरकारी बांधकामावर अथवा अन्य ठिकाणी नोकरी स्वीकारण्याचा विकल्प देऊ केलेला असावा. सदर व्यक्ती कोणत्याही वैध नोकरी/व्यवसायात स्वत:ला गुंतवून घेण्याची शक्यता नाही याची खात्री पटणे आवश्यक आहे.

¿ मुंबई पोलीस अधिनियम, कलम ५८: आदेश अंमलात असण्‍याची मुदत:
मुंबई पोलीस अधिनियम, कलम ५५, ५६, ५७ किंवा ५७-अ अन्‍वये पारीत केलेल्‍या आदेशात, हद्‍दपार केलेल्‍या व्‍यक्‍तीने, किती काळ हद्‍दीबाहेर राहवयाचे आहे ती मुदत नमुद असणे आवश्‍यक आहे. हद्‍दपारीचा काळ, हद्‍दपार केलेल्‍या व्‍यक्‍तीला, हद्‍दीतून घालवून दिल्‍याच्‍या दिनांकापासून दोन वर्षापेक्षा जास्‍त नसावा.

¿ मुंबई पोलीस अधिनियम, कलम ५९: सुनावणीची संधी देणे:   
मुंबई पोलीस अधिनियम, कलम ५५, ५६, ५७ किंवा ५७-अ अन्‍वयेच्‍या हद्दपार प्रकरणात, सामनेवाला याला सुनावणीची संधी देणे, त्याचे म्हणणे ऐकून/नोंदवून घेणे, सामनेवाला याने साक्षीदार हजर केल्‍यास अशा साक्षीदाराची सुनावणी घेणे,  सामनेवालाच्‍या वकीलाला हजर राहू देणे या गोष्टी महत्वाच्या आहेत, त्‍या नाकारता येणार नाहीत. तथापि, सुनावणीची नोटीस बजावूनही सामनेवाला हजर राहत नसेल तर त्‍याच्‍या अनुपस्‍थितीत योग्‍य तो आदेश पारीत करता येतो.

¿ मुंबई पोलीस अधिनियम, कलम ५९(१): पोलीस निरीक्षकापेक्षा वरील दर्जाच्‍या अधिकार्‍याने सुनावणीची संधी देणे:
मुंबई पोलीस अधिनियम, कलम ५५, ५६, ५७ किंवा ५७-अ अन्‍वयेच्‍या हद्दपार प्रकरणात प्राथमिक चौकशी पोलीस निरीक्षकापेक्षा वरील दर्जाच्‍या अधिकार्‍याने करावी. अशी प्राथमिक चौकशी करतांना, अशा अधिकार्‍याने सामनेवाला याला सुनावणीची संधी देणे, त्याचे म्हणणे ऐकून/नोंदवून घेणे, सामनेवाला याने साक्षीदार हजर केल्‍यास अशा साक्षीदाराची सुनावणी घेणे,  सामनेवालाच्‍या वकीलाला हजर राहू देणे आवश्‍यक आहे. अशी प्राथमिक चौकशी पूर्ण झाल्‍यानंतर, स्‍वयंस्‍पष्‍ट अहवालासह उपविभागीय दंडाधिकारी यांच्‍याकडे प्रकरण सादर करावे.

सामान्‍यत: संबंधीत पोलीस निरीक्षकाकडून हद्दपार प्रस्‍ताव उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयात सादर केला जातो. यावेळेस, अशा प्रस्‍तावात काही त्रुटी असल्‍यास, त्‍यांची पूर्तता करण्‍यासाठी, उपविभागीय दंडाधिकारी असा प्रस्‍ताव संबंधीत पोलीस निरीक्षकाकडे परत पाठवू शकतात. पुढे, उपविभागीय दंडाधिकारी असा प्रस्‍ताव उपविभागीय पोलीस अधिकार्‍याकडे प्राथमिक चौकशीसाठी पाठवितात.
उपविभागीय पोलीस अधिकारी, संबंधित प्रकरणाची प्राथमिक चौकशी करून स्‍वयंस्‍पष्‍ट अहवालासह उपविभागीय दंडाधिकारी यांच्‍याकडे प्रकरण फेरसादर करतात. काही ठिकाणी संबंधीत पोलीस निरीक्षकाकडून हद्दपार प्रस्‍ताव उपविभागीय पोलीस अधिकार्‍याकडे सादर केला जातो. उपविभागीय पोलीस अधिकारी, संबंधित प्रकरणाची प्राथमिक चौकशी करून स्‍वयंस्‍पष्‍ट अहवालासह उपविभागीय दंडाधिकारी यांच्‍याकडे प्रकरण सादर करतात.
संबंधीत पोलीस निरीक्षकाकडून हद्दपार प्रस्‍ताव उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयात सादर होणे- उपविभागीय दंडाधिकार्‍याने असा प्रस्‍ताव उपविभागीय पोलीस अधिकार्‍याकडे प्राथमिक चौकशीसाठी पाठविणे- उपविभागीय पोलीस अधिकार्‍याने संबंधित प्रकरणाची प्राथमिक चौकशी करून स्‍वयंस्‍पष्‍ट अहवालासह उपविभागीय दंडाधिकारी यांच्‍याकडे प्रकरण सादर करणे हा क्रम योग्‍य आहे. यामुळे पोलीसांनी काहीतरी पुरावे गोळा करून हद्‍दपार प्रस्‍ताव तयार केला असे म्‍हणता येत नाही आणि जाब देणार/सामनेवाला याला सुनावणीची योग्‍य संधी दिल्‍याचे सिध्‍द होते.                 
¿ मुंबई पोलीस अधिनियम, कलम ५९(२): सक्षम प्रधिकार्‍याने सुनावणीची संधी देणे:
उपविभागीय पोलीस अधिकार्‍याने, हद्‍दपार प्रकरणाची प्राथमिक चौकशी करून स्‍वयंस्‍पष्‍ट अहवालासह उपविभागीय दंडाधिकारी यांच्‍याकडे प्रकरण सादर केल्‍यानंतर, उपविभागीय दंडाधिकारी यांनी सुध्‍दा सामनेवाला याला सुनावणीची संधी देणे, त्याचे म्हणणे ऐकून/नोंदवून घेणे, सामनेवाला याने साक्षीदार हजर केल्‍यास अशा साक्षीदाराची सुनावणी घेणे,  सामनेवालाच्‍या वकीलाला हजर राहू देणे आवश्‍यक आहे.

¿ मुंबई पोलीस अधिनियम, कलम ६०: अपील:
मुंबई पोलीस अधिनियम, कलम ५५, ५६, ५७ किंवा ५७-अ अन्‍वये हद्दपारीचा आदेश पारीत केला असल्‍यास, सामनेवाला याला, हद्दपारीचा आदेश मिळाल्‍याच्‍या दिनांकापासून तीस दिवसाच्‍या आत, राज्‍यशासनाकडे अपील दाखल करता येईल.

¿ मुंबई पोलीस अधिनियम, कलम ६१: राज्‍यशासनाच्‍या आदेशाची अंतिमता:
मुंबई पोलीस अधिनियम, कलम ५५, ५६, ५७ किंवा ५७-अ अन्‍वये हद्दपारीच्‍या आदेशाविरूध्‍दच्‍या अपीलावर राज्‍यशासनाने दिलेला निकाल हा अंतिम असेल.  
  
¿ मुंबई पोलीस अधिनियम, कलम ६२: हद्दपारीचा आदेश बजावुनही एखादी व्यक्ती स्वत: निघून जाण्यास कसूर करेल किंवा निघून गेल्यानंतर ज्या क्षेत्रातून काढून टाकले आहे त्या क्षेत्रात विनापरवाना प्रवेश करेल त्याला ज्या क्षेत्रातून काढून टाकले आहे त्या क्षेत्राबाहेर पोलीस अभिरक्षेत ठेवता येईल.

¿ मुंबई पोलीस अधिनियम, कलम ६२(): जी व्यक्ती हद्दपारीच्या आदेशान्वये त्या क्षेत्रातून निघून गेली आहे त्या व्यक्तीला त्या क्षेत्रात येण्याची तात्पुरती परवानगी देता येते. अशी तात्पुरती परवानगी देतांना काही अटी लादता येतात. या अटींचा भंग झाल्यास अटक करता येऊ शकते. शक्यतो धार्मिक विधींसाठी लगेच परवानगी द्यावी.

 महत्‍वाचे:
P हद्दपारीची मुदत सर्वसाधारणपणे दोन वर्षापेक्षा जास्त नसावी.
P हद्दपारीचा अहवाल प्राप्त झाल्यावर संबंधीत उपविभागीय पोलीस अधिकार्‍यामार्फत प्राथमिक चौकशी करावी. त्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर स्वत: सुनावणी घ्यावी.
P सामनेवाला याने सुनावणीसाठी हजर राहवे म्हणून बाँड घेता येतो. तरीही तो गैरहजर राहिल्यास त्याच्या गैरहजेरीत आदेश काढता येतो.
P हद्दपारीच्या आदेशाविरूध्द तीस दिवसाच्या आत शासनाकडे अपील दाखल करता येते.
P नागरीकांना घटनेनुसार कोठेही संचार करण्याचे स्वातंत्र्य राज्‍य घटनेने प्रदान केले असले तरी त्यावर शासन काही बंधने घालू शकते. सार्वजनिक हिताच्या दृष्टीने हद्दपारीचा कायदा वैध आहे.
P हद्दपार प्रकरणात नैसर्गिक न्यायतत्वाचे नियम पाळले गेले पाहिजेत.
P हद्दपार प्रकरणातप्रस्तावित हद्दपार व्यक्ती, 'आरोपी' असे शब्द वापरु नये, त्या ऐवजीगैर अर्जदार, 'सामनेवाला किंवाजाब देणारअसे शब्द वापरावेत.

F एका आदेशान्वये हद्दपार करण्यात आलेल्या व्यक्तीच्या समाज विघातक कारवाया एका तालुक्यापुरत्या मर्यादित असूनही त्याला १०० मैलापेक्षा जास्त क्षेत्रातून हद्दपार केले गेले होते. त्यामुळे उच्च न्यायालयाने सदर आदेश रद्द केला.
F एका हद्दपार प्रकरणात, सामनेवाला विरोधात सबळ पुरावा नसतांनाही, चांगल्या वर्तणूकीचे बंधपत्र घेण्यात आले होते परंतू असे बंधपत्र घेण्याची तरतूद मुंबई पोलीस अधिनियम, १९५१ मध्ये नसल्यामुळे कुंदन नारायण भोईर विरूध्द महाराष्ट्र शासन या रिट पिटिशन क्र. ५४७/८९ मध्ये उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने हद्दपारीचा आदेश रद्द केला होता.  
                                          
|{{|
आदेश नमूना - १:
डॉ. संजय कुंडेटकर, उपविभागीय दंडाधिकारी, xxx उपविभाग, (जिल्हा xxx) यांच्या न्यायालयातील कामकाज
||
                                                                                                                  हद्दपार/२४/२०१३
                                                                                                                  दिनांक: ०३/xx/xxx
पोलीस निरीक्षक,
xxx पोलीस स्टेशन
ता. xxx जि. xxx                                        ......                                             अर्जदार
                                                              विरूध्द
 भास्कर हणमंत xxx
 रा. कुमठे ता. xxx जि. xxx                           ......                                             जाब देणार

मुंबई पोलिस अधिनियम, १९५१ चे कलम ५६ () () अन्वये कामकाज

निकालपत्र

पोलिस निरीक्षक, xxx पोलीस स्टेशन ता . xxx जि. xxx यांनी दि. xxx रोजी जाब देणार भास्कर हणमंत xxx रा. कुमठे, ता. xxx, जि. xxx याचे विरुध्द मुंबई पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ५६ () अन्वये  हदद्पार प्रस्ताव सदर केला आहे.

प्रस्तुत हदद्पार प्रकरणी मुंबई पोलीस अधिनियम १९५१, कलम ५९(१)  अन्वये उपविभागीय पोलीस अधिकारी, xxx यांची चौकशी अधिकारी  म्हणून, उपविभागीय दंडधिकारी, xxx उपविभाग, जि. xxx यांच्या कडील आदेश क्रमांक हदद्पार/एस आर/ xxx / xxx दि. xxx अन्वये नियुक्ती करण्यात आली होती.

उपविभागीय पोलीस अधिकारी, xxx यांनी सदर प्रकरणी चौकशी करुन, त्यांच्याकडील  जावक क्रमांक xxx दि. xxx अन्वये चौकशी अहवाल सदर केला आहे.
         
या कार्यालयातर्फे जाब देणार यांना दिनांक xxx रोजी नोटीस काढून दि. xxx रोजी हजर राहण्यायची समज देण्यात आली, त्यानुसार जाब देणार हे माझ्या समक्ष हजर राहीले व त्यांनी तोंडी युक्तीवाद सादर केला.
जाब देणार यांचे म्हणणे असे की, यांच्यावर xxx पोलीस स्टेशन येथे फक्त हाच एकमेव गुन्हा गु. . . xxx नोंदवलेला आहे. सदर गुन्ह्याची सुनावणी न्यायालयात अदयापही सुरु आहे.
मुंबई पोलिस अधिनियम कलम ५६ च्या तरतुदी नुसार आम्ही तडीपारीच्या निकषात बसत नाही. आमच्या विरुध्द राजकिय दबावातून सदरचा प्रस्ताव सादर केला आहे, त्यामुळे तो फेटाळण्यात यावा.

मी उपरोक्त प्रकरणातील कागदपत्रे, पोलीस अधिका-यांनी पाठवलेले अहवाल आणि जाब देणार यांचे म्हणणे ऐकले आहे. त्या सर्वांचे अवलोकन करता मी खालील निष्कर्षा पर्यंत आलो आहे.

१) जाब देणार यांच्या विरुध्द गु... xxx हा एकमेव गुन्हा दाखल असुन तो न्यायालयात प्रलंबित आहे .
२) जाब देणार यांच्‍या लेखी म्हणण्यानुसार असे दिसून येते की, सदर गुन्ह्यातील फिर्यादी यांचे विरुध्द् xxx पोलीस स्टेशन येथे काही गुन्हे दाखल असुन त्यांचे विरुध्द  चाप्टर केसेसही दाखल करण्यात आलेल्या आहेत.
३) दि. xxx रोजी xxx पोलीस स्टेशन येथे नोंदविलेला खबरी जबाब लक्षात घेता, फिर्यादी मारुती बाळासाहेब xxx यांनी जाब देणार भास्कर हणमंत xxx यांनी त्याला मारहाण केल्याचे नमूद नाही.
४) जाब देणार यांच्‍या दहशती वागण्यामुळे त्याच्या विरुध्द पुरावा दिल्यास आपल्या जीविताला धोका होईल व मालमत्तेची हानी होईल या भीतीने याच्या  विरुध्द साक्ष देण्यास कोणीही समोर येत नसल्याचा कोणताही पुरावा अर्जदारांनी सादर केल्याचे दिसून येत नाही.
५) जाब देणार यांना यापूर्वी कोणत्याही प्रकारची शिक्षा न्यायालयाने  दिल्याचे दिसून येत नाही.
६) वर नमूद गुन्हा दाखल झाल्यानंतर जाब देणार यांनी नंतर कोणताही गंभीर गुन्हा केल्याचा अहवाल सादर करण्यात आलेला नाही.
७) जाब देणार याला हदद्पार करण्यास पुरेसा सबळ पुरावा किंवा कारण अर्जदारांनी सादर केल्याचे दिसून येत नाही.

सबब,  मी डॉ. संजय कुंडेटकर, उपविभागीय दंडधिकारी, xxx उपविभाग, जि. xxx,  मुंबई पोलिस अधिनियम १९५१, चे कलम ५६() () अन्वये मला प्राप्त असलेल्या अधिकाराचा वापर करुन खालील प्रमाणे आदेश देत आहे.

आदेश

जाब देणार भास्कर हणमंत xxx रा. xxx, ता. xxx, जि. xxx यांच्या विरुध्द अर्जदार, पोलिस निरीक्षक, xxx पोलिस स्‍टेशन, ता. xxx, जि. xxx यांनी दाखल केलेला हदद्पारीचा प्रस्ताव रदद् करण्यात येत आहे.
         
सदर निर्णयाची समज सर्व संबंधितांना देण्यात यावी. 

या आदेशाविरूध्‍द मुंबई पोलीस अधिनियम १९५१, कलम ६० अन्‍वये, सदर आदेश मिळाल्‍याच्‍या दिनांकापासून तीस दिवसाच्‍या आत राज्‍यशासनाकडे अपील दाखल करता येईल.
                                                              मुद्रा                                    डॉ. संजय कुंडेटकर,
ठिकाण: xxx                                                                                       उपविभागीय दंडाधिकारी,
दिनांक: xxx                                                                                       xxx उपविभाग, जिल्हा xxx

आदेश नमूना - २:
डॉ. संजय कुंडेटकर, उपविभागीय दंडाधिकारी, xxx उपविभाग, (जिल्हा xxx) यांच्या न्यायालयातील कामकाज
||
                                                                                                                  हद्दपार/४५/२०१३
                                                                                                                  दिनांक: ०९/xx/xxx
पोलीस निरीक्षक,
xxx पोलीस स्टेशन
ता. xxx जि. xxx                                        ......                                             अर्जदार

                                                              विरूध्द

 महेश वामन xxx
 रा. वाघोली ता. xxx जि. xxx                       ......                                             जाब देणार

मुंबई पोलिस अधिनियम, १९५१ चे कलम ५७ () () अन्वये कामकाज

निकालपत्र

पोलिस निरीक्षक, xxx पोलीस स्टेशन ता . xxx जि. xxx यांनी दि. xxx रोजी जाब देणार महेश वामन xxx रा. वाघोली, ता. xxx, जि. xxx याचे विरुध्द मुंबई पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ५७ () अन्वये  हदद्पार प्रस्ताव सदर केला आहे.

प्रस्तुत हदद्पार प्रकरणी मुंबई पोलीस अधिनियम १९५१, कलम ५९(१) अन्वये उपविभागीय पोलीस अधिकारी, xxx यांची चौकशी अधिकारी म्हणून, उपविभागीय दंडधिकारी, xxx उपविभाग, जि. xxx यांच्या कडील आदेश क्रमांक हदद्पार/एस आर/ xxx / xxx दि. xxx अन्वये नियुक्ती करण्यात आली होती.

उपविभागीय पोलीस अधिकारी, xxx यांनी सदर प्रकरणी चौकशी करुन, त्यांच्याकडील  जावक क्रमांक xxx दि. xxx अन्वये चौकशी अहवाल सदर केला आहे. त्‍या अहवालात त्‍यांनी नमुद केले आहे की, सामनेवाला याने सन २००९ व २०१२ मध्‍ये भा.दं.वि. कलम २४६, २४७, २५०, २५१ अन्‍वये गुन्‍हा केला होता. त्‍याचा गुन्‍हा xxx पोलीस ठाणे येथे गु.र.नं. xxx अन्‍वये तसेच xxx पोलीस ठाणे येथे गु.र.नं. xxx अन्‍वये नोंदविला असून, फौजदारी दावा क्र. xxx अन्‍वये त्‍याला xxx महिन्‍याच्‍या कारावासाची शिक्षा देण्‍यात आली होती. ती शिक्षा भोगून तो नुकताच बाहेर आला आहे. सदर प्रकारचा गुन्‍हा तो पुन्‍हा करण्‍याची दाट शक्‍यता आहे. त्‍यामुळे त्‍याला तीन वर्षासाठी हद्‍दपार करावे.    
         
या कार्यालयातर्फे जाब देणार यांना दिनांक xxx रोजी नोटीस काढून दि. xxx रोजी हजर राहण्यायची समज देण्यात आली, त्यानुसार जाब देणार हे माझ्या समक्ष हजर राहीले व त्यांनी तोंडी युक्तीवाद सादर केला.
जाब देणार यांचे म्हणणे असे की, यांच्यावर xxx पोलीस स्टेशन येथे दोन गुन्हे गु. . . xxx आणि गु. . . xxx नोंदविले होते. त्‍यात फौजदारी दावा क्र. xxx अन्‍वये xxx महिन्‍याची कारावासाची शिक्षा भोगलेली आहे. आणि आता मी सुधारलो आहे.

मुंबई पोलिस अधिनियम कलम ५७ च्या तरतुदी नुसार मी तडीपारीच्या निकषात बसत नाही. माझ्‍या विरुध्द राजकिय दबावातून सदरचा प्रस्ताव सादर केला आहे, त्यामुळे तो फेटाळण्यात यावा.
मी उपरोक्त प्रकरणातील कागदपत्रे, पोलीस अधिका-यांनी पाठवलेले अहवाल आणि जाब देणार यांचे म्हणणे ऐकले आहे. त्या सर्वांचे अवलोकन करता मी खालील निष्कर्षापर्यंत आलो आहे.

१) जाब देणार यांच्या विरुध्द xxx पोलीस ठाणे येथे गु.र.नं. xxx अन्‍वये तसेच xxx पोलीस ठाणे येथे गु.र.नं. xxx अन्‍वये नोंदविला होता असे खबरी अहवालावरून दिसून येते.
२) फौजदारी दावा क्र. xxx अन्‍वये जाब देणार याने xxx महिन्‍याची कारावासाची शिक्षा भोगलेली आहे.
३) जाबदेणार शिक्षा भोगून आल्‍यानंतरही याच्‍या विरुध्द् xxx पोलीस स्टेशन येथे xxx, xxx, या चाप्टर केसेसही दाखल करण्यात आलेल्या आहेत.
४) जाब देणार यांच्‍या दहशती वागण्यामुळे त्याच्या विरुध्द पुरावा दिल्यास आपल्या जीविताला धोका होईल व मालमत्तेची हानी होईल या भीतीने याच्या  विरुध्द साक्ष देण्यास कोणीही समोर येत नसल्याचा अहवाल व काही लोकांचे जबाब, अर्जदारांनी सादर केले आहेत.
५) सुनावणी दरम्‍यान काही साक्षीदारांचे जबाब नोंदविले गेले, त्‍यांवरून जाब देणार पुन्‍हा गंभीर प्रकारचा गुन्‍हा करण्‍याची दाट शक्‍यता आहे याबाबत माझी खात्री पटली आहे.   
६) शिक्षा भोगूनही जाब देणार यांच्‍या वर्तनात विशेष फरक पडल्‍याचे दिसून येत नाही.
७) जाब देणार याला हदद्पार करण्यास पुरेसा सबळ पुरावा अर्जदारांनी सादर केला आहे.

वरील मुद्‍द्‍यांचा उहापोह करता, जाब देणार यांना या न्‍यायालयाच्‍या स्‍थलसीमेत राहू देणे योग्‍य नाही या निष्‍कर्षापर्यंत मी आलो आहे. 

सबब,  मी डॉ. संजय कुंडेटकर, उपविभागीय दंडधिकारी, xxx उपविभाग, जि. xxx,  मुंबई पोलिस अधिनियम १९५१, चे कलम ५७ अन्वये मला प्राप्त असलेल्या अधिकाराचा वापर करुन खालील प्रमाणे आदेश देत आहे.

आदेश

जाब देणार महेश वामन xxx, रा. वाघोली ता. xxx जि. xxx यांच्या विरुध्द अर्जदार, पोलीस निरीक्षक, xxx पोलीस स्‍टेशन, ता. xxx, जि. xxx यांनी दाखल केलेला हदद्पारीचा प्रस्ताव मान्‍य करण्यात येत आहे.

जाब देणार महेश वामन xxx, रा. वाघोली ता. xxx जि. xxx याला एका वर्षाच्‍या मुदतीकरिता xxx जिल्‍ह्‍याच्‍या स्‍थलसीमेतून हद्‍दपार करण्‍यात येत आहे.
सदर आदेश जाब देणार याला प्राप्‍त झाल्‍यापासून एक वर्षाच्‍या मुदतीकरिता त्‍याने xxx जिल्‍ह्‍याच्‍या स्‍थलसीमेत प्रवेश करू नये. 
         
सदर निर्णयाची समज सर्व संबंधितांना देण्यात यावी.

या आदेशाविरूध्‍द मुंबई पोलीस अधिनियम १९५१, कलम ६० अन्‍वये, सदर आदेश मिळाल्‍याच्‍या दिनांकापासून तीस दिवसाच्‍या आत राज्‍यशासनाकडे अपील दाखल करता येईल.

                                                              मुद्रा                                    डॉ. संजय कुंडेटकर,
ठिकाण: xxx                                                                                       उपविभागीय दंडाधिकारी,
दिनांक: xxx                                                                                       xxx उपविभाग, जिल्हा xxx
प्रत: पोलीस निरीक्षक, xxx पोलीस स्‍टेशन, ता. xxx, जि. xxx
सदर आदेश जाब देणार महेश वामन xxx, रा. वाघोली ता. xxx जि. xxx याचेवर बजावण्‍यात यावा आणि त्‍याला तात्‍काळ xxx जिल्‍ह्‍याच्‍या स्‍थलसीमेच्‍या हद्‍दीबाहेर नेऊन सोडण्‍यात यावे.
केलेल्‍या कार्यवाहीचा अहवाल या न्‍यायालयात सादर करण्‍यात यावा.

                                                              मुद्रा                                    डॉ. संजय कुंडेटकर,
ठिकाण: xxx                                                                                       उपविभागीय दंडाधिकारी,
दिनांक: xxx                                                                                       xxx उपविभाग, जिल्हा xxx

b|b





Comments

Archive

Contact Form

Send

Mahsul Guru

Subscribe YouTube Channel